भारताच्या पश्चिम बंगालमधील काही भागात आज (मंगळवारी) सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल मोजण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू बंगालच्या उपसागरात असल्याचे समजते. आज सकाळी ६.१० वाजता दरम्यान ही भूकंपाची घटना घडली.
कोणतीही जीवित हानी नाही
या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. भूकंपाचा धक्का बसला तेव्हा अनेक जाण झोपेत होते. मात्र, धक्का जाणवताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली होती. या भूकंपाचे धक्के पश्चिम बंगालबरोबरच ओडिशातील काही भागातही जाणवले. गेल्या आठवड्यात दिल्ली, ओडिशा, बिहार आणि सिक्कीम या चार राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते..
Discussion about this post