
उदगीर/ कमलाकर मुळे :
राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त येथील संत गाडगे महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगे महाराज एक समाज सुधारक समाजातील अनिष्ट चालीरीती व प्रचलित अंधश्रद्धेवर प्रहार करून शिक्षणाची कासधरण्याचा उद्देश करणारे विज्ञानवादी संत होते.
मंदिरात देव राहत नसूनपुजारांचे पोट राहते, दगडात देव शोधण्यापेक्षा माणसातील देव ओळखा असा मानवतावाद मांडणारे तसेच अंधश्रद्धेत गुरफटून राहण्यापेक्षा कर्ममार्गावर चालण्याचा तसेच संपूर्ण मानव जातीस स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गाडगे महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, डॉक्टर शरद कुमार तेलगाणे प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे,अमोल गाजरे, प्रशांत शिंदे, संतोष गाजरे, बालाजी भालेराव, महादेव गाजरे,विजय तेलंगे, राजकुमार देवरे ,डेबू भालेराव ,आकाश भालेराव, आशिष भालेराव ,रामराज मोरे उपस्थित होते..
Discussion about this post