प्रतिनिधी: अहमद अन्सारी, पाथरी परभणी
परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे आयोजित विज्ञानवारी टप्पा क्रमांक -3 परीक्षेत PM SHRI जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानवत येथील दोन विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
✅ निवड झालेले विद्यार्थी:
- कु. श्रावणी सुरेश गोलाईत
- कु. संस्कृती सुनिल बोरबने
ही परीक्षा पूर्णतः प्रात्यक्षिक स्वरूपाची होती. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांची चाचणी घेण्यात आली.
🧪 प्रात्यक्षिक परीक्षेचे स्वरूप:
- प्रयोग सादरीकरण
- प्रयोगावर आधारित प्रश्नांची उत्तरे
- प्रयोगाशी संबंधित वस्तूंची ओळख
💡 मानवत तालुक्यातून निवड झालेल्या अन्य विद्यार्थ्यांची नावे:
📌 जिल्हा परिषद शाळा:
- इरळद: कु. संस्कृती भिसे, संध्या मुळे, संजना वासिंबे
- उक्कलगाव: सद्रुषी पिंपळे
- पोहंडूळ: गोविंद धोपटे
- सावळी: चैतन्य काळे
- देवलगाव (औ): कु. अंजली काशिनाथ आवचार
📌 खाजगी संस्था:
- ने.सु.वि.: रविकांत कडभाने, वेदांत कच्छवे
- SRDL: नयन अरुण गवते
या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मानवत शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक श्री. राजाभाऊ येडके, श्री. सचिन निलवर्ण, तालुका समन्वयक श्री. संजय पकवाने यांनी अभिनंदन केले. तसेच गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन भाऊ लाड, उपाध्यक्षा सौ. राणीताई गोलाईत, मुख्याध्यापक माणिक घाटूळ व विद्यालयातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
🎉 यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎉
Discussion about this post