पाथरी प्रतिनिधी.अहमद अन्सारी पाथरी परभणी.
पाथरी न .प. निवडणुक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेना शिंदे गट प्रतिष्ठेची करत असुन न.प.माजी नगरसेवक तसेच कार्यकर्ते पदाधिकारी हे शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत गेल्याच आठवड्यात मा.बाधकाम सभापती गोविंद हारकळ तसेच माजी नगराध्यक्षा सुनंदा ताई फलके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तर दोन दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी नेतृत्वाखाली जैतापूर प्रभागात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पाथरी नप निवडणुकीत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची तिस ते पस्तीस वर्षांपासून एकहाती सत्ता आहे परंतु गेल्या दोन तीन वर्षापासुन व विधानसभेत बाबाजानी दुर्राणी व शिवसेना अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांच्यात जोरदार प्रतीस्पर्धा दिसत असुन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शह -काटशह दोघांमध्ये पहायला मिळत आहे .

येणाऱ्या न.प.निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या समोर आहे तर भविष्यातील राजकारणाच्या सोयीसाठी न.प . आपल्या ताब्यात घेण्यासाठी सईद खान पाथरीतील मातब्बर कार्यकर्ते आपल्याकडे आकर्षित करत आहे.या सर्वांमध्ये कार्यकर्ते इकडुन तिकडे -तिकडुन इकडे ये जा करुन लपंडावचा खेळ खेळत असल्याने जनतेत मनोरंजनातमक चर्चा होत आहेत. नुकताच एक कार्यकर्ता बाबाजानी यांच्या जवळचा असलेला शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता परंतु काल मा.आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या समोर घरवापसी केली परंतु तिन ते चार घंट्यात सईद खान यांच्या गटात परत प्रवेश केला यामुळे अशा तऱ्हेने नगरपरिषद निवडणुकीसाठी पाथरी शहरात कार्यकर्त्यांची अशी रस्सीखेच होत असल्याचे पाहायला मिळत आहे .येणारी नगरपरिषद निवडणूक ही मा.आमदार बाबाजानी दुर्राणी व शिवसेना नेते सईद खान यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार असुन आमदार राजेश दादा विटेकर काय भूमिका घेतात यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे अशी पाथरी वासिया मध्ये चर्चा घडत आहेत.
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी.
Discussion about this post