विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील तालुक्यातील दहेगाव बंगला येथील शिनगारे वस्तीवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. यातील जखमींना गावातील तरुणांनी बजाज नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार सुरेश रंगनाथ शिनगारे वय ५५, मुलगा बाबासाहेब सुरेश शिनगारे यांच्या वस्तीवर दि. २५ रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हातात शस्त्र असलेल्या चौघा अनोळखी इसमांनी घरात प्रवेश करत घरातील सामानांची
उचकापाचक केली. चाकूचा धाक दाखवत इंदूबाई सुरेश शिनगारे वय ५०, सुन राणी बाबासाहेब शिनगारे वय ३० व नात वेदीका बाबासाहेब शिनगारे वय ६ ह्या महीलांचे कानातील व गळ्यातील हातातील पाटल्या चाकू दाखवून सर्व काढून घेतले. घरात असलेले चांदीच्या पाटली, पंधरा हजार रुपये नगद पैसे घेवून चोरटे पसार झाले. घटनेची माहिती करताच वाळूज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सहाकाऱ्यांसोबत घटनास्थळी भेट देत पहाणी केली व पुढील तपासाकामी सुचना दिल्या.
Discussion about this post