
उदगीर/ कमलाकर मुळे :
येथील सहसा भागात न आढळणारी सापाची असेल कुकरी ही प्रजा त सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अर्जुन मध्ये यांच्या संजय नगर सोमनाथपूर रोड येथील घरात सायंकाळी 7:30 वाजता आढळून आला. या बिनविषारी सापास उदगीर येथील वन्यजीव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य सर्पमित्र व्यंकटेश विजयकुमार तोरकडे आणि अध्यक्ष सर्पमित्र संदीप वाघमारे यांनी अतिशय कोणाशी इजा न होऊ देता ताब्यात घेतले. सापाला पाहून घरातील लोक आरडाओरडा केल्यानंतर बारकाईने पाहिले असता त्यांना साथ दिसला तेव्हा अर्जुन मध्ये यांनी तातडीने सर्पमित्र व्यंकटेश तोरकडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. तेव्हा हा साप पकडून जंगलात सोडण्यात आला.या प्रजाती विषयी माहिती देताना सर्पमित्र संदिप वाघमारे म्हणाले,की साधारणतःही प्रजात आपल्याकडे भारतात ईशान्यकडिल राज्य तसेच जमू -काश्मिर वगळता सर्वञ आढळून येते त्यांची सरासरी लांबी एक फूट तर अधिक उत्तम लांबी एक फूट अकरा इंच लांबी असून रंग व आकार डोके तसेच मानेवर उलटी इंग्रजी व्ही (त) ची खून पोट पांढरे किंवा फिकट पिवळसर अंगावर चार पिवळसर रेषा शरीर सडपातळ आखूड शेपूट, जंगलात किंवा दमट भागात आढळणाऱ्या या सापावर फिकट तपकिरी, रंगावर गडद तपकिरी धब्बे असतात व शुष्क प्रदेशात आढळणाऱ्या सापावर फिकट तपकिरी रंगावर चार रेषा असतात. प्रजनन एप्रिल महिन्यामध्ये मादी सुमारे पाच ते नऊ अंडी घालते .खाद्य लहान सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी तसेच उभयचर व त्यांची अंडी लहान असतात. असताना कीटक अळ्या व कोळी वास्तव्य जंगलामध्ये तसेच नागरी वस्तीच्या जवळपास वैशिष्ट्ये दिनचर तसेच निशाचर शांत स्वभावाचा पण चिडला असता शरीर फुगवून हल्ला चढवतो, अशी माहिती दिली. यावेळी सर्पमित्र विशाल कलुरे, सुरज वाघमारे, निशांत कांबळे, सुखदेव गोटमुकले, किरण पवार ,परमेश्वर गोटमुकले, गिरी, चंदू वाघमारे, अभिजीत कांबळे, अमोल कांबळे, कुशाल सूर्यवंशी, अभिषेक शिंदे, ब्रह्मदास सूर्यवंशी, सतिश वाघमारे, खंडू भोसले उपस्थित होते. आजपर्यंत सर्पमित्रांनी वाचविलेल्या प्रमाणात मोर, हरण, घुबड ,घोरपड ,माकड, रानटी ससा, शॅमोलियन सरडा ,होला ,पक्षी ,कावळा, कुंदमांजर ,मरलांगी, सायाळ इत्यादी ना जीवदान दिले. तरी सर्पमित्र संदीप वाघमारे यांनी 13 ते 14 वर्षात दहा हजार सापांना पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले..
Discussion about this post