
भंडारा :
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगाच्या निसर्गरम्य परिसरामध्ये असलेल्या तीर्थक्षेत्र गायमुख येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. तुमसर शहरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे.लहान महादेव अशी ओळख असलेल्या यात्रेला प्रत्येक वर्षी जिल्ह्यातीलच नाही तर पूर्व विदर्भ, मध्यप्रदेश,छत्तीसगढ येथील भाविक यात्रेला येतात. पर्वतातून येणारे झऱ्याचे पाणी गायीच्या मुखातून वाहत असल्याने गायमुख हे नाव पडले आहे.पाणी बारमाही वाहत असते.हे देवस्थान प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी एका ऋषीने या ठिकाणी शंकराची तपस्या केल्याची ते शिवाचे भक्त होते अशी आख्यायिका आहे. दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.या ठिकाणी येण्यासाठी एस . टी. महामंडळाकडून बस सुविधाही असते.भाविक नवस फेडण्यासाठी येत असतात .शंकराचा जयघोष करीत पायी चालणाऱ्या भाविकांची रीघ पाहायला मिळते.यात्रेत विविध राजकिय व सामाजिक संघटना महाप्रसादाचे आयोजन करतात..
Discussion about this post