
उदगीर/ कमलाकर मुळे :
येथील बस स्थानकासमोर असलेल्या पानपट्टीवर महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या 51 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी छापा मारून पकडला. तर एका विरुद्ध उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी दिनांक 25 दुपारी पोलिसांनी उदगीर बस स्थानकासमोर असलेल्या पानपट्टीवर छापा मारला .गुटखा व सुगंधी तंबाखू असा एकूण 51 हजार 867 रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला. पोलीस हवालदार धनराज उदय हारणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सोहेल फसीयोद्दीन पिंचनी यांच्या विरुद्ध 57/ 25 कलम 123 ,223,274, 275,बीएनएस व सहकलम 59 अन्नसुरक्षा व मानके अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते करीत आहेत..
Discussion about this post