

ऑल इंडिया संविधान आर्मी कडून मा.मुख्याधिकारी साहेब शहादा नगर परिषद ता.शहादा जि.नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले….
विषय : शहादा शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करणे बाबत…
महाशय,
वरील विषयास अनुसरून निवेदन सादर केले आहे की, शहादा नगर परिषद ही कायम सुप्तावस्थेत आहे. शहादे शहरात मोकाट श्वानांनी (कुत्रांनी) सगळीकडे उच्छाद मांडलेला आहे. रात्री-अपरात्री तर नागरिकांना पायी जाण्याची भिती वाटायला लागली आहे.अशी माहिती घटना स्थळा वरून मिळाली आहे.
कधी मोकाट श्वानांची भिती तर कधी पिसाळलेल्या कुत्र्यांची भिती.नगरपालीकेला वारंवार सांगुनही कोणीच ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायला तयार नाही.शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दि.20 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घटनास्थाळ वॉर्ड क्र. 2 गफूर नगर अमीर-ए-हमजा मस्जिद जवळ घरापासून जवळच्या किराणा दुकानात जात असतांना कु.अलिशा इम्रान पिंजारी या 9 वर्षीय मुलीवर 5 ते 6 कुत्र्यांनी हल्ला केला, मुलीच्या कानाला चावा घेतला मांडीचे लचके तोडले मांडीवर 6 टाके व कानावर सुद्धा 3 टाके बसले, त्या वेळीच गल्लीतील लोकांनी धाव घेऊन मुलीला पिसाळलेल्या कुत्र्यांपासून सोडवले नसते तर त्या दिवशी ह्या निष्पाप मुलीचा जीव गेला असता. घटनास्थळ वरून कडले आहे.या आधी सुद्धा अनेक वेळा याच ठिकाणी अशी घटना घडली आहे स्पष्ट झाले आहे तरी सदरच्या विषयावर गांभीर्याने विचार करून कायम स्वरूपी तोडगा काढणेस विनंती संविधान आर्मीच्या पूर्ण टीम कडून तसेच शहादा शहरातील सर्व नागरिकांनी केली आहे. तसेच अनेक राजकीय संघतेने काढून, व सामजिक संघटने कडून नगरपालीकेला अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत, मात्र नगरपालीका फक्त बघायची भुमिका घेऊन मुग गिळून गप्प बसले आहेत. अशी माहिती संविधान आर्मी जिल्हा अध्यक्ष मा.अल्तमसभाई मंसुरी कडून मिळाली. यावर तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा नागरिकांचा संयम संपायला वेळ लागणार नाही.
असा इशारा ऑल इंडिया संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र महामंत्री
मा.आकाशभाऊ जावरे यांनी केला आहे.
गंभीर जखमी:- कु.अलिशा इमरान पिंजारी ही मुलगी चार दिवस व रात्र सुश्रुत नर्सिंग होम (डॉ.बी.डी पटेल) यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होती व चार दिवस तिच्यावर उपचार चालू होता.
प्रशासन जबाबदार
जर ही तक्रार केल्यानंतरही नगर पालिका प्रशासन तत्काळ कारवाई निर्णय घेत नसेल, तर कुत्र्यांपासून होणारी कोणतीही घटनावर शहादा नगर पालिका प्रशासन जबाबदार राहील.
आठ दिवसाच्या आत जर का या विषयावर बंदोबस्त न झाल्यास नऊव्या दिवशी शहरातील नागरिक संदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील व त्या पूर्ण परिणामाची जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील.
निवेदन सादर करताना उपस्थित पदाधिकारी.
मा.आकाशभाऊ जावरे
(ऑल इंडिया संविधान आर्मी उत्तर महाराष्ट्र महामंत्री)
1.मा.अल्तमसभाई मन्सुरी (संविधान आर्मी जिल्हा अध्यक्ष)
2.मा.आवेशभाई पटवे
(शहादा शहर अध्यक्ष)
3.मा.जुबेरभाई शाह (शहादा शहर उपाध्यक्ष)
4.मा.मोईनभाई शाह (शहादा शहर युवा अध्यक्ष)
Discussion about this post