
महाराष्ट्र मध्ये पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असणारे हरणांचे संवर्धन केले जाते. हरीण या जातीसाठी प्रसिद्ध असणारे हे अभयारण्य धो.म. मोहिते यांच्या संकल्पनेतून साकारला गेले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हरणांचे संवर्धन करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे परंतु हरणांचा संवर्धन होत असलं तरी हे हरण या क्षेत्राच्या बाहेर येऊन शेतीच्या पिकांचे नुकसान करत असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी नेहमीच व्यक्त केलेली आहे त्यामुळे शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये होणारा संघर्ष सातत्याने वाढत असणारा दिसत आहेत त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या हल्लूयांमध्ये देखील हरणांचेबळी जात असल्याचे चित्र या प्रवेश परिसरामध्ये पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणामध्ये हरणांच्या असणारी असुरक्षितता आणि एकंदरीत शेतीचे होणारे नुकसान या दोन्ही मधून वन विभागाने मार्ग काढणे गरजेचे असल्याची भूमिका शेतकऱ्यांमधून बोलली जात आहे त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि दुसरीकडे हरणांची होणारे अशा पद्धतीने अवहेलना यामध्येमोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये उद्रेक दिसून येत आहे या परिसरामधील वन विभागाने या संदर्भामध्ये सागरेश्वर अभयारण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या आराखडा निर्माण करून हरणांचे योग्य संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या शेतीच्या संवर्धन या दृष्टिकोनातून एक मध्यम मार्ग काढण्याची गरज या परिसरातील वन्यप्राणी आणि पर्यावरण प्रेमी बोलून दाखवत आहे
Discussion about this post