

येरमाळा प्रतिनिधी – नागेश तोडकरी..
येरमाळा ता कळंब येथील श्री क्षेत्र नागझरी देवस्थान येथे येरमाळ्यासह पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.
येरमाळा येथील १८७० सालापासून असलेले आणि सर्वांच्या नवसाला लवकर पावणारे जागृत स्वयंभू श्री महादेव मंदिर श्री क्षेत्र नागझरी देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या संख्येने रीघ दिसून आली. १८७० साली गणा गोरे यांना साक्षात्कार होऊन प्रथम महादेव पिंड दर्शन सुरू झाले, त्यानंतर महादेव आप्पा गोरे व गंगाधर गोरे यांनी या ठिकाणी मंदिर बांधले, त्यानंतर त्यांचे वंशज नारायण गंगाधर गोरे यांनी सेवा चालू केली तीच परंपरा कायम पुढे ठेवून त्यांची मुले गणेश गोरे व महेश गोरे हे सध्या सेवा करतात. महेश गोरे यांच्या प्रयत्नातून व सर्व भाविक भक्तांच्या आर्थिक साह्यातून या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. येरमाळा येथील नागझरी येथे निसर्गरम्य वातावरणात असलेले महादेवाचे मंदिर हे येरमाळा सह पंचक्रोशीतील लोकांचे श्रद्धास्थान असून महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झाली होती, तसेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे गोरे परिवाराकडून सांगण्यात आले..
Discussion about this post