प्रा.दिलीप नाईकवाड सिदंखेडराजा /तालुका प्रतिनिधी
——–+++—————-
किनगाव जट्टू येथील विनोद सातपुते, व राजेश नागरे, यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम
राबविल्याबद्दल शिवराज्य बहुउद्देशीय संस्था देवगड, यांच्यावतीने, शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर, जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून, संत बाळकृष्ण महाराज, प्रकाशा नंदगिरी महाराज, सुनील गिरीजी महाराज, अब्दुल भैय्या शेख, कृषी शास्त्रज्ञ अशोकराव ढगे, संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, ताईसाहेब वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, याच अनुषंगाने किनगाव जट्टू येथील विनोद सातपुते व राजेश नागरे यांनी विविध उपक्रम राबवून, जनजागृती चे काम केल्यामुळे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्यांच्यासोबत कल्पना सातपुते, अलका नागरे, या सुद्धा उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन चौगुले सर यांनी केले. तालुक्यातील बबनराव उदावंत, निवृत्ती वायाळ, शिवराजभाऊ कायंदे, विष्णू भाऊ कायंदे, संतोष गिरी, प्रभाकर वखरे, गोविंद मुळे, राहुल कायंदे, राधेश्याम गायकवाड, डॉक्टर मंगेश मिसाळ, प्राचार्य मिसाळ, विवेक मिसाळ, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना अशोक
बुरकुल, परमेश्वर दानवे, अविनाश नागरे, उद्धवराव गायकवाड, प्रा. दिलीप नाईकवाड, यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post