वर्दडी तांड्यावर शोककळा.
प्रा. दिलीप नाईकवाड /सिंदखेडराजा-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वर्दडी बु. येथिल रहिवाशी व पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या तरूणाचा सातारा जिल्ह्यातील शिराळा येथे देवदर्शनाला जाताना कार अपघातात दुदैवी मृत्यू झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली आहे. कैलास ताराचंद चव्हाण ( वय ३० )असे मृत झालेल्या तरूणाचे नाव असून मूळ बेलवाडी तांडा वर्दडी बुद्रुक येथील रहिवासी आय. टी. इंजिनिअर म्हणून पुणे येथे पत्नी सह आळंदी येथे वास्तव्यास होता. रत्नागिरी जिल्ह्यातील नानीज येथे पत्नी कांचन चव्हाण वय २३) सासरे भीमराव दलपत पवार वय ५०) सासू वर्षा भीमराव पवार वय ४५) रा. गारटेकी ता. मंठा जि.जालना, कार चालक पवन संतोष राठोड रा. आळंदी मुळगाव पिंपरखेड ता.सिंदखेडराजा यांच्या सह देवदर्शनाला जात असतांना सातारा जिल्ह्यातील शिराळा येथील बायपास मार्गावरील गोरक्षनाथ मंदिर पुलाजवळ दुध वाहतूक गाडीची चारचाकी कारची धडक होऊन अपघात झाला यामध्ये चारचाकी गाडीतील कैलास चव्हाण यांचा जाग्यावर मृत्यू झाला तसेच कांचन चव्हाण, भीमराव पवार, वर्षा पवार, चालक पवन राठोड हे गंभीर जखमी झाले असता त्यांना शिराळा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचाराची दाखल करण्यात आले आहे. कैलास चव्हाण यांच्या दुदैवी मृत्यूने बेलवाडी तांड्यावर शोककळा पसरली आहे. कैलास चव्हाण यांच्या पश्चात पत्नी आई वडील एक भाऊ असा परिवार आहे.
Discussion about this post