मौजे- वडकशिवाले, ता-आजरा येथील तलाठी कार्यालयाचे ग्रामस्थांच्या तर्फे गावातील महिलांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
आजरा: प्रतिनिधी,
मौजे-वडकशिवाले, ता-आजरा येथे तत्कालीन सरपंच श्री संतोष बेलवाडे यांच्या कार्यकाळात व पुढाकारातून सन 2021-22 मध्ये तलाठी कार्यालय मंजूर झाले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज ग्रामस्थांच्या हस्ते त्याचे लोकार्पण संपन्न झाले. तत्कालीन मंत्री मा. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सहकार्यातून या कार्यालयाच्या बांधकामाला निधी उपलब्ध झाला. बरीच वर्षे तलाठी कार्यालय गावातील ग्रामस्थांच्या घरात भाड्याने घेऊन चालू होते. स्वतंत्र कार्यालय झालेने ग्रामस्थांनि आनंद व्यक्त केला.
यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post