वरोरा तालुका प्रतिनिधी :- उमेश कोटकर
तालुक्यातील जवळच असलेल्या महालगाव (खु.) कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री ०९. ३० वाजताच्या दरम्यान वनकर्मचारी एस. के. शेंडे व.प.अ. वरोरा, डी. बी. चांभारे क्षे. स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे. स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, ब्राम्हनाथ वनरक्षक रामपूर, रोजनदारी वनमजूर व पि.आर.टि. टीम गस्त करीत असताना आरोपी रुपेश धारसिंग दडमल, जयचंद सरबत मालवे, रामा संजय दडमल सर्व राहणार हिरापूर पो. कोसरसार ता. वरोरा जिल्हा. चंद्रपूर व संदीप बालिकाचन्द्र शेरकुरे रा. धोपटाळा, ता. कोरपणा, जिल्हा. चंद्रपूर हे कक्ष क्र. २ राखीव वनामध्ये संक्षयाप्पद अवस्थेत आढळून आले. त्यांची विचारणा केली असता ते वन्यप्राण्याची शिकार करण्याकरिता आल्याचे सांगितले. त्यांचेकडून शिकरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य वाघूर, लोखंडी भाला, नायलॉन दोरी, दुचाकी वाहन, मोबाईल जप्त करण्यात आलेले असून त्याच्यावर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, २(१६) व ५१ अन्वये वनगुन्हा नोंद करून आरोपीना ताब्यात घेऊन कोर्ट विधमान प्रथम श्रेणी न्यायालय वरोरा येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हजर करण्यात आले. पुढील चौकशी व्ही. तरसे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू), चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर याचे मार्गदर्शनात सतीश के. शेंडे, वनपरीक्षेत्र अधिकारी वरोरा डी. बी. चांभारे क्षे. स. टेमुर्डा, जे. के. लोणकर क्षे. स. शेगाव, एस. व्ही. वेदांती वनरक्षक महालगाव, करकाडे, केजकर, ब्राम्हनाथ वनरक्षक करीत आहे…
Discussion about this post