प्रतिनिधी:- विलास लव्हाळे
वैजापूर : उन्हाळ्याची चाहूल लागताच वैजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांत नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत असून, आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाईस तोंड देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समिती प्रशासनाकडे पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर्सचे प्रस्ताव दाखल होत आहेत. २१ फेब्रुवारीअखेर तालुक्यातील १३ गावांनी टँकर्सचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. सध्या हिंगणे कन्नड, सावखेड खंडाळा, जिरी/ मनोली, बळहेगाव, आघूर, तिडी, मकरमतपूर, नायगव्हाण / वळण, माळीसागज, मनेगाव, आंचलगाव, बिलोणी, दसकुली या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे टँकर्ससाठी प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे किरण पोपळघट यांनी दिली. मागील वर्षी उन्हाळ्यात १४५ टँकर्सद्वारे व विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यात आला होता. सध्या तालुक्यातील सटाणा, मन्याड येथील साठवण तलावात पाणीसाठा उपलब्ध असून, विहिरींनाही काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्याने प्रशासनामार्फत येथून टँकर्सद्वार
Discussion about this post