प्रतिनिधी, विजय बारस्कर
शंभर दिवशीय नियोजनाच्या आराखड्यातील मूल्यमापनाच्या प्रगती पुस्तकात मृद व जलसंधारण विभाग द्वितीय क्रमांकाने पास झाल्या बद्दल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वागत मंत्री संजय राठोड यांनी केले
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत मृद व जलसंधारण विभागाच्या आतापर्यंतच्या कामाचे सादरीकरण केले यावेळी शासनाच्या 15 विभागाचे त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थळी सुखद जीवनमान स्वच्छता तक्रार निवारण अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवा विषयक बाबी चा वापर नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषावरच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले या मूल्यमापनात आपल्या नेतृत्वाखाली मृत व जलसंधारण विभाग द्वितीय क्रमांक प्राप्त झाला
राज्याचे शेतकरी बांधव समृद्ध आणि आनंदी व्हावे यासाठी शेतीसाठी मुबलक व संरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपला विभाग कटिबद्ध आहे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त शिवार अभियानाद्वारे पाझर तलाव साठवण तलाव बंधारे सिमेंट नाला बांध यांची कामे सुरू असून सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कामाचा गती देण्यात आली आहे
राज्य विभाग जिल्हास्तरीय प्रशासन लोकाभिमुख गतिमान पारदर्शी करण्यासाठी काम करण्याच्या सर्व अधिकार कर्मचाऱ्यांनी कौतुक केले 16एप्रिल 2025 पर्यंत जी विशेष मोहीम सुरू असून अधिक व्यापक व प्रभावीपणे काम करावे यासाठी शुभेच्छा देतात असल्याचे संजय राठोड यांनी म्हटले आहे.
दारवा दिग्रस नेर मतदार संघातून प्रभावी वाटचाली बद्दल शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
Discussion about this post