लिंगणूर (ता. मिरज, जि. सांगली) – कै. मेजर चौरंगनाथ एकनाथ सोनूरे यांच्या ११ व्या पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प. तुकाराम सोनूरे महाराज यांचे किर्तन मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात संपन्न झाले.
या प्रसंगी गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनाच्या माध्यमातून संतपरंपरेचे विचार आणि जीवनमूल्यांवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सोनूरे परिवार व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Discussion about this post