बातमीदार-कु.गणेश राम यादव,दी.26/2/2025
उद्धररामेश्वर,सुधागड, रायगड,महाराष्ट्र,येथे सालाबादप्रमाणे 282वा महाशिवरात्री उत्सव मोठया जल्लोषात आनंदाने पालखी मिरवणूक काढून साजरा करण्यात आला आहे. उद्धर रामेश्वर उत्सवासाठी महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून कानकोपऱ्यातुन अनेक शिवभाविक शिवभक्तगण दरवर्षी महाशिवरात्री उत्सवासाठी शिव दर्शनासाठी शेकडो भक्तांच्या रांगेत लाईनमध्ये उभे राहून दर्शन घेत असतात. सन 1743 रोजी उद्धर रामेश्वर येथे शिवलिंग स्थापन केलेले आहे. रायगड जिल्हा धर्मादाय आयुक्तांकडे श्री रामेश्वर महादेव देवस्थान रजि.नं.ए.786 असे नोंदणीकृत संस्था आहे. या देवस्थानची गिरीवासी रामेश्वर व खालचे रामेश्वर अशी शंकराची दोन स्वयंभु मंदिरे आहेत. संपूर्ण मंदिर दगडी असून त्याचे बांधकाम मराठी शैलीत झाले आहे. या मंदिराचे बांधकाम वेदमूर्ती शिवराम भट चित्राव यांनी केलेले आहे. तशा प्रकारचा शिलालेख मंदिराच्या डाव्याबाजूस आहे. फार वर्षांपुर्वीपासून खालचे रामेश्वर या ठिकाणच्या मंदिराच्याजवळ दोन नद्यांच्या संगमावर दशक्रियाविधी करण्यात येतो. या ठिकाणी एक छोटे अस्थीकुंड असून त्यात अस्थी विसर्जन केल्यावर त्या हाडांचे तीन दिवसांत पाणी होते.
हिंदूधर्माच्या मान्यतेनुसार माणसाच्या हाडांचे पाणी झाले की त्याला मोक्ष मिळतो आहे. दशक्रियाविधी करण्यासाठी महाराष्ट्रातुन अनेक जिल्ह्यातुन उद्धर रामेश्वर येथे भाविक भक्तगण दररोज येत असतात. दरवर्षी खालचे रामेश्वर मंदिरासमोर महाशिवरात्री उत्सवाला मोठी जत्रा भरते आहे. विविध व्यावसायिक फुलांची, फळांची, प्रसादाची, अनेक खाद्यपदार्थांची, खेळण्यांची, घरगुती भांड्यांची, वैगरे वैगरे अनेक वस्तूंची दुकानें भरवीत असतात. यातून अनेक दुकानदारांना खुप खुप पैसा मिळत असतो आहे. संपूर्ण महाशिवरात्रीच्या आयोजनात ग्रामस्थ मंडळ उद्धर, नवतरुण मंडळ ठाणे आणि श्री रामेश्वर देवस्थानचे पंच यांचा येथे मोठा सहभाग असतो आहे. या कार्यक्रमात रामेश्वर देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री.प्रदीप लांगी, श्री.महेश लहाने, श्री.अमर लहाने, श्री.विकास लहाने, श्री.दामोदर ठाकूर या ट्रस्टीनी देणगीदार यांचे मान्यवरांचे स्वागत केले आहे. या सर्व कार्यक्रमाची तयारी संस्थेचे लिपिक श्री.किरण लहाने व श्री.बबन जठार यांनी केली आहे. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवभक्त श्री.प्रमोद लांगी यांनी केलेले आहे. एक लाख भाविक भक्तगनांनी महाशिवरात्री उत्सवासाठी येथे हजेरी लावलेली असुन अनेक जणांना याठिकाणी भाविकांना दर्शन घ्यायला मिळालेले आहे. अनेक दुकानदार मालामाल झालेले आहेत. देवस्थान मालामाल झालेले आहे.
न्युज रिपोर्टर-रायगड/पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार- कु.गणेश राम यादव-मो.8483014657-कॉल-व्हा.


Discussion about this post