लोहा-कंधार प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसचे माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री नवाब मलिक, माजी आमदार यशवंतराव माने, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अविनाश घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी आणि शहराध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
मोहन अण्णा हंबर्डे यांनी काँग्रेसला रामराम करत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नांदेडचे नेते, माजी खासदार आणि आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे लोहा-कंधार आणि नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
– प्रतिनिधी
Discussion about this post