( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ येथे लिलाबाई हटकर यांनी केली निवेदनाद्वारे मागणी )
✍🏻 प्रविण इंगळे उमरखेड तालुका प्रतिनिधी मो, 7798767266
यवतमाळ (दिनांक २८ फेब्रुवारी)
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथील ग्रामपंचायत हद्दीतील पांदन रस्त्यामधून निघालेल्या नाल्यावर स्लॅब टाकून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणे आणि संबंधित ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करणे या बाबतचा अर्ज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी पंचायत समिती उमरखेड येथे देण्यात आला होता. पण अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. कर्तव्यावर कसूर असणाऱ्या गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांची खातेनिहाय चौकशी करा.
अशी तक्रार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारदार लिलाबाई लक्ष्मणराव हटकर यांनी केली आहे.
तक्रार अर्ज दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी पंचायत समिती उमरखेड येथे दिला होता परंतु यावर अद्यापही कोणतीही कारवाई आजपर्यंत झालेली नाही. कर्तुत्वावर कसूर असणारे गटविकास अधिकारी हे सदर ग्रामसेवक डी.बी. सूर्यवंशी यांना पाठीशी घालून पाठराखण करीत आहेत. म्हणून गटविकास अधिकारी यांचीही खातेनिहाय ही चौकशी करण्यात यावी.
तसेच डी.बी सूर्यवंशी ग्रामसेवक यांनी मला नाला साफसफाई करण्याकरिता १० हजार रुपयाची मागणी केली होती.
तसेच काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक यांच्या विरोधात मी तक्रार केल्यामुळे सदर ग्रामसेवक यांनी माझ्या घरी येऊन अरेरावीची भाषा करत म्हणाले की, तुम्ही कुठेही गेला तरी माझं काही ही वाकड होणार नाही, अशी अरे रावीची भाषा करत मला एक प्रकारची धमकी दिली आहे. म्हणून मा, साहेबांनी याची चौकशी करून मला न्याय देण्यात यावा आणि गावातील शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहील याकरिता संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर कडक कारवाई करून सदर मागणी मार्ग काढावे.
सदर कारवाई ८ दिवसाच्या आत न झाल्यास मला आमरण उपोषणाला बसल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
Discussion about this post