
बलात्का-याचा चौरंग करा पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात दोन दिवसांपुर्वी महिलेवर झालेल्या बलात्काराचा निषेध करण्यासाठी आज लोकसंघर्ष पक्षातर्फे कलाकार कट्टा, डेक्कन पुणे येथे लोक संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडली, पक्षाचे अध्यक्ष अँड योगेशजी माकणे यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले,

राजाचं प्रथम कर्तव्य नागरिकांना अन्न, वस्त्र, न्याय व सुरक्षा देणे असते. परंतु, आज राज्यात नागरिक स्वतःच्य अन्न, वस्त्र स्वतः कमावत आहेत न्याय तर मिळत नाही मग कमीत कमी सुरक्षा तरी त्या अशी मागणी केली. परंतु, महायुतीचे सरकार सर्व बाबतीत नागरिकांचे हाल करत आहेत, आज राज्यात फक्त महिला असुरक्षित नाही तर लहान मुले, जेष्ठ नागरिक देखिल रोज भीतीच्या वातारणात जगत आहेत. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे आरोपी आणि गुन्हेगार महिल्यांवर अत्याचार करण्यासाठी मोकाट सोडायचे असे धोरण महायुती सरकारने लावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसा रांज्याच्या पाटलाचा चौरंग केला होता तसे व्हिआयपी असो, सेलेब्रेटी असो किंवा गुन्हेगार असो त्याचा चौरंग झालाच पाहिजे अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच राज्याचे गृहमंत्री राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहेत त्यामुळे त्यांनी राजीनामा दयावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Discussion about this post