प्रतिनिधी: सुकदेव शिवदास चौधरी (Mob: 9022900632)
मावजीपाडा (ता. नंदुरबार) येथे दि. २८ फेब्रुवारी २०२५, शुक्रवार सकाळी ७:४५ वाजता एक धक्कादायक घटना घडली. अरुण काशिनाथ गांगुर्डे हे आपल्या वडिलांसोबत शेतात पाणी भरण्यासाठी गेले असता, अज्ञात वन्यप्राण्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून, तातडीने त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
➡ सर्व शेतकरी आणि गुरे राखणाऱ्या नागरिकांसाठी इशारा
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतकरी, गुरे मेंढ्या चारणारे बांधव आणि लहान मुले यांना शेतात जाताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
➡ सुरक्षिततेसाठी या उपाययोजना करा
✔ शक्यतो एकटे शेतात जाऊ नका
✔ लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना आवश्यक असल्यासच सोबत घ्या
✔ संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित वनविभाग किंवा पोलिसांना कळवा
✔ शेतात जाताना काठी, टॉर्च आणि अन्य सुरक्षात्मक साधने बाळगा
पोलीस पाटील व ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.
📢 – प्रतिनिधी, सुकदेव शिवदास चौधरी
Discussion about this post