सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
सांगली, ०१ मार्च : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या समाधीस्थळी भेट देत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील हे देखील उपस्थित होते. पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील हे एक विद्यापीठ होते. त्यांचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.
माजी मुख्यमंत्री पद्मभूषण दिवंगत डॉ. वसंतरावदादा पाटील यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारक म्हणून योगदान दिले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकीय भूमिकेत आल्यानंतरही त्यांनी आपली तत्वे, मूल्ये जपली. ते सर्वसामान्य माणसाला आपले करणारे नेतृत्व होते. वर्षानुवर्षे ज्यांच्या स्मृती पुसल्या गेल्या नाहीत, असे वसंतरावदादा यांचे नेतृत्व होते. शिक्षणासाठी दक्षिणेला जाणारा ओढा त्यांनी विनाअनुदानित महाविद्यालये सुरू केल्याने थांबला. आजही राजकारणात त्यांचे अनेक दाखले दिले जातात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी केंद्रीय राज्य मंत्री प्रतीक पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, शैलजा पाटील, जयश्री पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी, पाटील कुटुंबिय आदि उपस्थित होते.
Discussion about this post