प्रतिनिधी:- प्रीतम कुंभारे
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) च्या खाजगीकरण विरोधात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन ने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद देत #AISF_भंडाराच्या वतीने आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या मोहाडी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्च्यात 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
#नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली ‘राज्यातील ४१९ सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) खासगीकरण करण्यात येत असून, त्याअंर्तगत ‘आयटीआय’चा विकास आणि शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी उद्योगसमूहांसह स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे असल्याचे सरकार गोडस दाखवित आहे.

आयटीआय च्या विकासाच्या नावाखाली सरकारने पूर्णपणे गोरगरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे बंद करण्याचा डाव असून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट, श्री श्री रविशंकर; तसेच अनिरूद्ध बापू यांच्या संस्थांशी करार करून आयटीआय चे पूर्ण नियंत्रण या धार्मिक संस्थांकडे देऊन शिक्षणाच्या भगवेकरणाची तयारी राज्य सरकार करीत आहे. याचा ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन कडाडून विरोध करते.
Discussion about this post