प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर सावळे
जळगाव शहरातील एका उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून अश्लिल शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता शाळेचे चेअरमन आणि मुख्याध्यापक या दोघांवर शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात असलेल्या उर्दू शाळेत ४२ वर्षीय महिला शिक्षिका नोकरीला आहेत. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानच्या काळामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळेचे चेअरमन या दोन दोघांनी महिला शिक्षिकेला धक्काबुक्की करून त्यांच्या मनात लज्ज उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. तसेच त्यांना अश्लिल शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दरम्यान अनेक वेळा त्यांना शाळेत शिकवत असताना त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून महिला शिक्षिकेने अखेर गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार या शाळेचे मुख्याध्यापक आणि चेअरमन या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील करीत आहे.
Discussion about this post