उदगीर /कमलाकर मुळे :
जळकोट तालुक्यातील गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, घोणसी, देवूळवाडी, कोदळी, मांजरी, शिवाजीनगर, रामपूर तांडा, डोंगरगाव, मरसांगवी, रावणकोळा, हळदवाढवणा, अतनूर तांडा, मेवापूर तांडा, फक्क्रूतांडा, धोंडवाडी, मोरर्तळवाडी, मुतलगाव, तिरुका, खंबळवाडी सह २८ गाव, वाडी, तांडा, वस्तीतील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या या भागातील हजारो बांधकाम मजूर दारांना तथा लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांड्यांच्या संच व साहित्यांच्या पेट्या त्वरित वाटप करण्यात यावेत, अन्यथा कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त कार्यालय लातूर यांच्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष गिरीधरआप्पा गायकवाड अतनूरकर, तसेच अतनूर शाखा अध्यक्ष विश्वासराव पाटील अतनूरकर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई बुक्तार-कांबळे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या परिसरातील हजारो कष्टकरी बांधकाम कामगार आणि मिस्त्री कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत लातूर तसेच जळकोट व इतर महा-ई-सेवा केंद्र, ऑनलाईन सेंटर, सीएससी सेंटर, गल्लीबोळात, जागोजागी थाटून बसलेल्या ऑनलाइन सेंटर वरती मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीपूर्वी गत एक वर्षांपूर्वी ग्रामसेवकांचे ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र व ठेकेदाराकडे काम करीत असल्याचे प्रमाणपत्र सह इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाकडे ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. या ऑनलाइन नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना आजपावेतो कुठलेही प्रकाराची कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत लाभ या लाभाच्या योजनाची माहिती तसेच संसार उपयोगी भांड्यांच्या संच व साहित्यांच्या पेट्या वाटप करण्यात आलेल्या नाहीत. हे खेंद्दाने येथे नमूद करावे वाटते. याबाबत या भागातील कामगारांसाठी अहोरात्र, निष्पक्षपाती पणे, निस्वार्थीपणे काम करणाऱ्या एकनिष्ठ कामगार, कामगार संघटना, कष्टकरी, कष्टकरी संघटना, हमाल, मापाडी, माथाडी कामगार, भारतीय मजदूर संघ, राष्ट्रीय मजदूर संघ, अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस संघटना, कष्टकरी संघटना, बांधकाम कामगार राष्ट्रीय संघटना, कामगारांच्या हक्काचं व कष्टाचं, घामाचे कष्टाचे पैसे त्यांना मेहनतीचे आणि लाभाचे मोबदला मिळावा म्हणून अहोरात्र सतत प्रयत्न करीत असतात. पण या भागातील हजारो इमारत व इतर बांधकाम कामगारांनी, लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करूनही त्यांना कल्याणकारी मंडळाकडून आजपावेतो गेल्या एक वर्षांपासून कुठल्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यांच्या हक्काचा हा लाभ, संबंधित लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांडे व कामगार साहित्यांचे वाटप त्वरित करण्यात यावे. या भागातील बांधकाम कामगार लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी त्वरित करण्यात यावी. त्यांना मंजुरी देण्यात यावी. त्यांना बांधकाम कामगार ओळखपत्र पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावे. वर्षं-वर्ष नोंदणी करूनही त्यांना बांधकाम कामगारांचे ओळखपत्र कल्याणकारी मंडळाच्या विविध योजनांचा लाभ आज पावेतोही मिळत नाही. तो त्वरित मिळवून देण्यात यावा. याकरिता या भागातील कष्टकरी कामगार संघटना, भारतीय मजदूर संघ व इतर संघटनेने कामगार आयुक्त, कामगार उपायुक्त, कामगार सचिव, कामगार मंत्र्यापर्यंत गेली चार महिन्यांपासून सतत पत्रव्यवहार, तोंडी-लेखी सह प्रत्यक्षात भेटी घेऊनही मागणी केली. पण आज पावेतो यांच्या तक्रारीला, निवेदनाला यांच्या मागणीला, केराची टोपली दाखविण्यात आली आहे. असे गिरीधरआप्पा गायकवाड यांनी सांगितले. या मागणीची त्वरित दखल नाही घेतल्यास संबंधित बांधकाम कामगार व इमारत कल्याणकारी मंडळाच्या कामगार आयुक्त व उपायुक्त कार्यालयासमोर लाभार्थ्यांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे..
Discussion about this post