सांगली पंचायतन संस्थानचे युवराज आदित्यराजे विजयसिंहराजे पटवर्धन यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांना हिज हायनेस विजयसिंह राजे पटवर्धन आणि हर हायनेस राजलक्ष्मीराजे पटवर्धन यांनी शुभेच्छा दिल्या. युवराज आदित्यराजे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली शहर आणि परिसरामध्ये विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून श्री गणेश मंदिरातही रक्तदान शिबीर सकाळी ९ ते ११ या वेळेमध्ये आयोजित केले आहे. आज सकाळी ९ वाजलेपासून गणेश मंदिरात पूजा पाठ होमहवन तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
Discussion about this post