
सोयगाव :
तालुक्यातील चारू तांडा येथील अल्पभूधारक शेतकरी ईश्वर मुलचंद जाधव (४५) या कर्जबाजारी शेतकऱ्यांने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी रात्री ९.३० वाजता ही घटना लक्षात आली.
सततचा दुष्काळ, खर्च करूनही हाती न आलेले उत्पन्न या विवंचनेत या शेतकऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतला.उत्पन्नच हाती नाही अन त्यातच कर्ज फेडण्याची चिंता या तणावात या शेतकऱ्याने गळफास घेतला असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मोलमजुरी करून त्यांचा चरितार्थ सुरू होता. त्यांच्यावर खाजगी व राष्ट्रीयकृत बँकेचे इतर बँकांचे कर्ज होते, पण ते भरता येणे शक्य नसल्याने त्यांनी चिंतेने व्याकुळस्थितीत गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहेत.
त्यांच्यामागे दोन मुली, एक मुलगा पत्नी आणि आई व विवाहित मुलगी एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी फरदापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान महसूल विभागाने शुक्रवारी घटनेचा पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.
—-दोन महिन्यांत सात शेतकऱ्यांच्या आत्महत्या :-
सोयगाव तालुक्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत कर्जाला कंटाळून सात शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.तालुका प्रशासनाने अद्यापही तालुक्यात शेतकऱ्यांना समुपदेशन केलेले नसून जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे या बाबत मात्र प्रशासन गाफील आहे..
Discussion about this post