
तिसगाव (ता. खुलताबाद) येथील तिसगाव विद्यालयात 31 वर्ष सेवा बजावून एम.एफ.पटेल सर यांना 28 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त निरोप देण्यात आला. यावेळी शाळेत आयोजित निरोप समारंभासाठी आलेले गावकरी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद. सत्कारमूर्ती पटेल सर हे सहकुटुंब उपस्थित होते.यावेळी शाळेतील शिक्षक आवाले सर,हिवर्डे सर,मोटे सर,तिडके सर, राठोड सर,पवार सर, वानखेडे सर,अधाने सर,चौधरी सर, गायके सर व शाळेतील सर्व कर्मचारी यांनी एम.एफ.पटेल सर यांच्या ३१ वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला.व संस्थेच्या वतीने थाटामाटात सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना मुख्याध्यापक बि.एन राठोड सर यांनी क्रीडा शिक्षक व गणित शिक्षक पटेल सर यांचा शाळेत केलेल्या कामगिरीचा कौतुकास्पद उल्लेख केला. त्याच बरोबर शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर यांनी पुढील कौटुंबिक जिवन साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. पटेल सर एक गणित शिक्षक नसून एक गणित तज्ज्ञ होते.असे शिक्षक गणितासाठी पुन्हा मिळणे अशक्यच असे काही पालकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.त्याचबरोबर तिसगाव गावातून मिरवणूक काढून गावक-यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर फुलांचा वर्षाव करुन पुढील कौटुंबिक जिवनासाठी खुप खूप शुभेच्छा दिल्या.त्यांच्या हातून घडलेले विद्यार्थी काही सरकारी नोकरी करत आहेत तर काही खाजगी संस्थांत काम करत आहेत..
तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे..
Discussion about this post