पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी ३,५०० कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ फेब्रुवारीला दिली होती.अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र, आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती.यावरुन विरोधकांकडून टीका सुरु करण्यात आली.
अखेर, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ५ मार्च पासून मिळण्यास सुरुवात होणार असून ८ मार्च च्या आत सर्वांना पैसे मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज दिली.
दरम्यान, महायुतीनं लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास २१०० रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे, येत्या १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. १० मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे महिलांचं लक्ष लागलंय.
Discussion about this post