41 Total Views , 1 views today
मुंबई | Maharashtra
राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्च रोजी, म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
यावेळी बोलताना तटकरे यांनी सांगितले की, “लाडकी बहीण योजनेवर विरोधक आधीपासूनच टीका करत आहेत. मात्र, आम्ही या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचू शकलो आहोत. गेल्या महिन्यातदेखील 2 कोटी 40 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला होता, आणि फेब्रुवारी महिन्यातही तोच आकडा कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यातील महिलांना आर्थिक दिलासा मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
(प्रतिनिधी)
Discussion about this post