ग्रामीण भागातील महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
पातुर (जि. अकोला): पातुर पंचायत समिती अंतर्गत खे ट्री ग्रामपंचायतमध्ये वित्त साक्षरता प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या शिबिरात बचत, विमा, कर्ज, आर्थिक सुरक्षेच्या उपाययोजना आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. महिलांनी या प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिरातील प्रमुख मान्यवर:
- सरपंच जहूर खान
- केंद्र व्यवस्थापन अधिकारी सचिन आढाव
- महिला बचत गट अधिकारी पुष्पा शिंदे
- सीआरपी रेखा कैलास वाडेकर, शारदा ताले
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ‘समृद्धी नारी आर्थिक सप्ताह’ उपक्रमाअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध फायद्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
महिलांनी एकत्र येऊन बचत गटाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला बचत गट अधिकारी आढाव यांनी केले. या शिबिरामुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेविषयी जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात याचा मोठा लाभ होणार आहे.
Discussion about this post