
प्रशांत पाटील/ अहिल्यानगर संपादक –
कोपरगाव मतदारसंघातील कोकमठाण येथील एकलव्य टायगर फोर्स संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप काशिनाथ पवार व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी तसेच डाउच बुद्रुक येथील दिपक कांबळे व सुनिल गायकवाड यांनी युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाने आणि कार्यशैलीने प्रभावित होवून भारतीय जनता पक्षात सोमवारी प्रवेश केला त्याबददल युवानेते व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सत्कार केला.
प्रारंभी जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष शरद थोरात यांनी प्रास्तविक केले. कोपरगांव बाजार समितीचे माजी सभापती संभाजीराव रक्ताटे यांनी स्वागत केले. याप्रसंगी नंदु पवार, गोकुळ शिंदे, कल्याण दहे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेकभैय्या कोल्हे म्हणाले जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी उपस्थित सर्वांचे स्वागत आहे. माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी आदिवासी समाज बांधवांच्या विकासासाठी मोठे काम उभे केले होते. वास्तविक मूळ भूमिपुत्र समजला जाणाऱ्या आदिवासी समाज बांधवांच्या अनेक क्षेत्रातील सहकार्याने देश प्रगती करतो आहे.भारतीय जनता पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असतो.बिपीनदादा कोल्हे, मा.आ.स्नेहलताताई कोल्हे यांचे सातत्याने प्रयत्न जनविकासाला प्राधान्य देणे हेच असते.
प्रवेश करणाऱ्या सर्वांना नेहमी भविष्यात साथ राहील आणि सामाजिक विकासासाठी सोबत राहू असा विश्वास दिला.बालपनापासून अनेकदा आदिवासी बांधवांच्या समवेत वेळ घालवल्याच्या आठवणी देखील यानिमित्ताने त्यांनी जागवल्या.
प्रवेश करणा-यात कोकमठाण येथील एकलव्य संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख नाना पवार, एकलव्य विद्यार्थी संघटना कोपरगांवचे प्रसाद सोनवणे, रविंद्र गायकवाड, किरण भालके, शिवाजी बर्डे, कुंदन धिवर, नितीन गायकवाड, अजय गायकवाड, शाम गायकवाड, आकाश बर्डे, सोपान गायकवाड, राम गायकवाड, सचिन पवार, कैलास गायकवाड, गणेश गांगुर्डे, हरी गायकवाड, गणेश मोरे, धर्मेश साटोटे, बाळु मोरे, सोमनाथ पवार, गोकुळ गायकवाड, सचिन गायकवाड, शंकर गायकवाड, आकाश गायकवाड, सागर गायकवाड, किरण गायकवाड यांचा समावेश आहे. सुत्रसंचलन संजीवनीचे जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे यांनी केले..
Discussion about this post