माणुसकीचा आणि दातृत्वाचा संगम म्हणजे अनिरुद्ध ( बाळ ) केसरकर..
आजरा: प्रतिनिधी,
दोन दिवसापूर्वी गांधीनगर येथील सौं आरती गायकवाड या गरीब महिलेच्या घराला आग लागून त्यांचे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू तसेच घर जळून खाक झाले. काही दानशुर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांना वेळीच हातभार लावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आजऱ्यातील सामाजिक तसेच राजकीय वलय लाभलेले व्यक्तीमहत्व अनिरुद्ध ( बाळ) केसरकर – भाजपा तालुका अध्यक्ष, स्वराज्य तालीम मंडळाचे संस्थापक. यांनी कोणताही विलंबन करता त्यांच्या घराची पाहणी करून त्यांना आवश्यक असणारे गृहपयोगी साहित्याची मदत केली त्यांच्या या दातृत्वाचे शहरात कौतुक होत आहे. अशी हि पहिलीच वेळ नाही तर या अगोदर वेळोवेळी गरजुना मदत केलेली आहे.
एकाच्या गोट्याला आग लागून तीन ते चार म्हैशी दगावल्या होत्या त्यावेळी सुद्धा बाळ केसरकर यांनी मदत केली. एखाद्या गरीबाची मदत करायची असते तेंव्हा देवदुतासारखे धावून येणारे त्यांनी जातपात धर्म पंत याचे कोणतेही बंधन न पाळता सर्वांना सढळ व खुल्या हाताने मदत करीत असतात.
माणुसकीचे आणि दातृत्वाचे अनोखा संगम म्हणजे बाळ केसरकर या प्रसंगी स्वराज्य तालीम मंडळाचे कार्यकर्ते तसेच बाळ केसरकर प्रेमी युवक उपस्थित होते
अशा कार्याला सलाम!
Discussion about this post