
शिराळा /प्रतिनिधी..
गरजवंताना, आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देणे, ही लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी घालून दिलेली शिकवण आजही कायम आहे, असे प्रतिपादन ‘विश्वास’ कारखान्याचे संचालक व विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
येळापूर पैकी जामदारवाडी (ता. शिराळा) : येथे पाच कुटुंबांना प्रत्येक 20 हजार रुपये प्रमाणे 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्ट कडून देण्यात आला. सदर धनादेशाचे वाटप त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक शिवाजी पाटील, सुहास घोडे-पाटील व दत्तात्रय पाटील प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. नाईक म्हणाले, येळापूर खालील जामदारवाडी येथील तुकाराम जामदार, अभिषेक जामदार, तानाजी जामदार, सर्जेराव जामदार, रामचंद्र जामदार यांच्या घरांना 17 फेब्रुवारी 2025 शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी ‘विश्वास’ कारखान्याकडील अग्निशामक यंत्रणा मिळण्यासाठी मला फोन आल्यानंतर ती तातडीने रवाना केली होती. त्यामुळे मोठे नुकसान टळले. मात्र घरांचे व कौटुंबिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदार व समंधीत यंत्रणांना भेटून जास्तीची नुकसान भरपाई मिळावी म्हणूनही मी प्रयत्न केले.
ते म्हणाले, आपद्ग्रस्तांना मदत करण्याची परंपरा लोकनेते फत्तेसिंगराव नाईक यांनी आम्हाला घालून दिली आहे. ती अखंडपणे सुरू असून अप्पांच्या नावाने सुरू असलेल्या इंडोमेंट ट्रस्ट मार्फत जामदार कुटुंबीयांना प्रत्येकी 20 हजार रुपये प्रमाणे पाच कुटुंबास 1 लाख रुपयांचे धनादेश मदत म्हणून देण्यात आले आहेत.
प्रारंभी उपसरपंच किसन आटुगडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अध्यक्ष विराज नाईक, कार्यकारी संचालक श्री. पाटील, यांच्यासह संचालकांच्या हस्ते जामदार कुटुंबीयांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानदेव पाटील, लक्ष्मण वाघमारे, राजू खांडेकर, शिवाजी वाघमारे, शिवाजी गायकवाड, आनंदा पाटील, निवृत्ती पाटील, शंकर चव्हाण, आनंदा जामदार, संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post