
शिराळा /प्रतिनिधी..
शिराळा नगरी महाराष्ट्रातील टॉप मोस्ट नगरी बनवण्यासाठी प्रयत्नशील असून शिराळा शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सहकार्य करावे असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान योजने अंतर्गत प्राप्त अग्निशमन वाहनांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते.
या कार्यक्रमास मुख्याधिकारी तथा प्रशासक नितीन गाढवे, पोलिस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, नायब तहसीलदार हसन मुलाणी, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, संपतराव देशमुख, हणमंतराव पाटील
ॲड भगतसिंग नाईक, जयसिंगराव शिंदे, रणजितसिंह नाईक, के.डी.पाटील,अभिजित नाईक, किर्तीकुमार पाटील, केदार नलावडे, अनिता धस, कुलदीप निकम, प्रतापराव यादव, सम्राट शिंदे, शंकर कदम, दिलिप कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा शहराच्या चौफेर विकासा मॅप घेऊन पुढे चाललो आहे. माझी बांधीलकी जनतेशी आहे. सरकारने शिराळा शहरासाठी १८ ते २० कोटी एवढा प्रचंड निधी दिला आहे. शहरात भव्य क्रिडांगन, कुस्ती आखाडा, व्यायाम शाळा उभारणे आवश्यक आहे. मंदिरांच्या आवारात वृंदावन व गार्डनची मागणी आहे ती लवकरच पूर्ण करू. आपल्याकडे चांगल्या अभ्यासिका असने गरजेचे आहे. यासाठी फंडातून निधी उपलब्ध करून देऊ. जलीकटू व बैलगाडी शर्यतीच्या नियमातून नागपंचमीसणाला एकदिवसीय शिथिलता देण्यासाठी प्रयत्नशील असून ती लवकरच सत्यात उतरणारं. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्न करणारं. विकासाची यंत्रणा सक्षमपणे राबवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने सजगतेने प्रयत्न करावेत.
मुख्याधिकारी तथा प्रशासक नितीन गाढवे म्हणाले, नगरपंचायत प्रशासनाने अग्निशमन यंत्रणेची मागणी प्रशासनाकडे अनेक दिवसांपासून केली जात होती. आमदार सत्यजित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आज या मागणीला यश आले. महाराष्ट्र अग्निशमन आणि आणीबाणी सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायती यांना शासनामार्फत ८१लाख व नगरपंचायत हिस्सा ९ लाख असे एकूण ९० लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात येते. सदर योजनेअंतर्गत आमदार सत्यजित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर झालेल्या निधीतून
शिराळा नगरपंचायतीने नागरिकांना सुसज्ज व तत्पर अग्निशमन सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने अग्निशमन वाहन खरेदी केले आहे. हे वाहन टाटा कंपनीच्या १८ टन भारवहनक्षमता असणाऱ्या चासी वर बांधणी केलेल्या वाहनाची वॉटर टॅंक कपॅसिटी ५००० लिटर व फोम टॅंक कपॅसिटी ५०० लिटर आहे. २००० लिटर प्रति मिनिट मारा करण्याची क्षमता असणारा पंप असल्यामुळे इमारतीच्या ८ ते ९ व्या मजल्यापर्यंत पाणी फेकून आग विझवण्याची क्षमता या अग्निशमन वाहनामध्ये आहे. शिराळा नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष प्रयत्नशील आहे. तसेच नागरी सेवा, सोयी सुविधा जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशासन कुशलतेने काम करत असून यास आमदार सत्यजित देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
यावेळी अधिक्षक नारायण गोसावी, सहाय्यक अधिक्षक प्रकाश शिंदे, पाणी पुरवठा अभियंता स्नेहल पन्हाकर, लेखापाल हणमंत कांबळे, लेखा परीक्षक नलिनी भिंगारदेवे, सुभाष इंगवले, गणपती यादव, विजय शिंदे, आबाजी दिवान, सदानंद टिळे, संजय इंगवले, तात्यासाहेब कांबळे, मुनीर लंगरदार, प्रीती पाटील, काजल शिंदे, रंजना कांबळे, माजू नगरसेविका प्रतिभा पवार, सुनिता निकम, बसवेश्वर शेटे, डॉ प्रमोद काकडे, उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील, सचिन नलवडे, पै. अभिजित शेणेकर, विरेंद्र पाटिल, राम पाटील आदींसह पदाधिकारी, ग्रामस्थ व नगरपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post