सिद्धटेक-राशीन रस्त्यावरील कामामुळे धुळीचा त्रास; स्थानिक व्यावसायिक त्रस्त सिद्धटेक, ता. कर्जत : सिद्धटेक-राशीन मार्गाचे सिमेंटकरणआणि रुंदीकरणाचे काम सध्या सुरू असून या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा थेट फटका या मार्गावर असलेल्या व्यावसायिकांना बसला असून त्यांचा व्यवसाय घटला

आहे.व्यवसायावर परिणामरस्त्याच्या कामामुळे उडणाऱ्या धुळीमुळे हॉटेल, मेडिकल, किराणा दुकान आणि इतर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. ग्राहक धुळीमुळे त्रस्त असल्याने या परिसरात येणे टाळत आहेत. त्यामुळे या दुकानांमधील उलाढाल मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.व्यावसायिकांची मागणीस्थानिक व्यावसायिकांनी
प्रशासनाकडे तक्रार करून रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाण्याचा फवारा मारण्याची मागणी केली आहे. तसेच काम लवकर पूर्ण करून व्यवसाय सुरळीत सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.आरोग्यावर परिणामधुळीमुळे अनेक नागरिक
आणि व्यावसायिकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. सततच्या धुळीमुळे डोळ्यांची जळजळ, घसा खवखव आणि इतर आरोग्यविषयक समस्या वाढल्या आहेत.”रस्त्याचे काम महत्त्वाचे आहे, परंतु त्याचवेळी व्यवसाय आणि आरोग्याचे नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्थानिक व्यावसायिक करत आहेत
.- प्रतिनिधी सोमनाथ यादव खोमणे
Discussion about this post