दिनांक – ०४.०३.२०२५
सोलापूर प्रतिनिधी
डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. अंधश्रद्धा व अज्ञान निर्मूलनाबरोबर सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येतात त्याचा एक भाग म्हणून आज सोलापूर शहरात श्री सदस्यांनी रविवारी २ मार्च सकाळी नऊ वाजता
स्वच्छतेला सुरूवात छत्रपती शिवाजी चौकातून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आली.
सोलापूर शहरात १४ मार्गावर डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे तब्बल ४४८६ सदस्यांनी या स्वच्छता अभियान सहभागी होवु तब्बल अडीच तासात सोलापूर शहामधुन १८८टन आलो व सुका कचरा गोळा करण्यात आली.
हा कचरा बाहेर काढण्यासाठी ५७ टॅंक्टर, ८ डॅपर, ७ छोटा हत्ती, ३९ घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचरा उचलण्यात आला.
या स्वच्छता अभियानात सहभागी डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य तसेच सिनिअर डिव्हिजन न्यायाधीश उमेश देवषी यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.
यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे वकील, कार्यालयीन कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी तसेच महापालिकेचे आरोग्य निरीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी ही सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाची मोहिम ११.३० पुर्ण झाली. सोलापूर शहर अडीच तासात चकचकीत करण्यात आली.
Discussion about this post