*सावली, ४ मार्च २०२५सावली तालुक्यातील मौजा जिबगाव येथे माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री मा. खा. अशोकजी नेते यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मा. खा. अशोकजी नेते यांच्या स्थानिक विकास निधीतून व विशेष पाठपुराव्याने मंजूर झालेल्या कामांसाठी त्यांनी विधिवत कुदळ मारून भूमिपूजन केले.*भूमिपूजन झालेली विकासकामे:*1️⃣ हनुमान मंदिर सौंदर्यीकरण (खनिज निधी अंतर्गत) – ₹१० लाख2️⃣ नामदेव मेश्राम ते नामदेव भोयर यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड व नाली बांधकाम (जनसुविधा निधी अंतर्गत) – ₹१० लाख3️⃣ दिलीप बट्टे ते कोहळे यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड व नाली बांधकाम (खनिज निधी अंतर्गत) – ₹१० लाख*ग्रामस्थ व मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग*या महत्त्वाच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाशभाऊ पाल, तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिशभाऊ बोम्मावार, गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष अरुणजी हरडे, ज्येष्ठ नेते अरुणजी पाल, भाजपा कोषाध्यक्ष तथा युवा नेते किशोरजी वाकुडकर, सरपंच पुरुषोत्तम चुदरी, दलित आघाडी तालुकाध्यक्ष लोकनाथजी रायपूरे, माजी सरपंच दुर्गाताई गेडाम, अनिल येंगंटीवार, युवा नेते सुरजभाऊ किनेकर, उपसरपंच नरेश बाबनवाडे, साखरीचे उपसरपंच रविंद्र गेडाम, आशिषभाऊ भांडेकर, राजू देशमुख (अध्यक्ष, सेवा सहकारी सोसायटी, जिबगाव), दिलीप चुदरी, अशोकजी पाल, निलकंठ भोयर (माजी संचालक, सेवा सहकारी सोसायटी), नामदेव डांगे, बाबुराव गेडाम, मारोती गेडाम, किसनजी बोरकुटे, रामदास बोरकुटे, दिलीपजी लाडे, मापारी कुमार रोहनकर आदी मान्यवर उपस्थित होते.*गावाच्या विकासाला नवी दिशा*या विकासकामांमुळे जिबगाव व परिसरातील पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मा. खा. अशोकजी नेते यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या या कामांमुळे गावाच्या विकासाला गती मिळेल, असे प्रतिपादन यावेळी मा.खा. अशोकजी नेते यांनी उपस्थितांना केले.
Discussion about this post