भुम.तालुका सह ईट शहर कडकडीत बंद .
सरपंचांची हत्या अमानवी; आज भुम तालुका बंद.
.सारथी महाराष्ट्रचा न्यूज नेटवर्क.
भुम: बीड जिल्ह्यातील
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करून व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. या हत्याऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी ५ मार्च रोजी सर्व समाजबांधवांच्या वतीने बुधवारी भुम.धाराशिव. बंदची हाक देण्यात आली आहे.
केज (जि. बीड) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आली. या सर्व कृत्यांची काही छायाचित्रे
सोमवारी सोशल मीडियासह अन्य प्रसारमाध्यमातून समोर आल्यानंतर सर्वच समाजघटकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटताहेत. शहरांसोबतच वाडी, वस्ती, गावखेड्यातून निषेध नोंदविला जात आहे.
दरम्यान, अमानवी पद्धतीने केलेल्या या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कठोरात कठोर म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत भुम धाराशिवकरांच्या वतीने बुधवारी भुम .ईट.धाराशिव ‘जिल्हा बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
मार्च 05, 2025
Discussion about this post