नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर पॉलिटेक्निक ज्ञानेश्वर खाजगी आयटीआय व बीसीए कॉलेजच्या विद्यार्थ्यांची परिसर मुलाखत मधून संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेड, एन आर बी बेअरिंग लिमिटेड, वेबसम सॉफ्टवेअर लिमिटेड व अहमदनगर येथील ए टू झेड लिमिटेड कंपनीचे औद्योगिक प्रकल्पा मध्ये जॉब साठी 124 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशी माहिती ज्ञानेश्वर तंत्रनिकेतन चे प्राचार्य श्री हेमंत अहिरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअर चे शिक्षण घेता यावे,विद्यार्थ्यांचे इंजीनियरिंग क्षेत्रातील ज्ञान वाढवून या विद्यार्थ्यांना शंभर टक्के टक्के नोकरीची हमी मिळावी या उदात्त हेतू व उद्देशाने या तांत्रिक ज्ञानाच्या शिक्षण शाखा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेशराव बेल्हेकर यांनी सुरू केल्या आहेत.यातूनच इतर औद्योगिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून परिसर मुलाखतीतून या पॉलिटेक्निक, बीसीए कॉलेज व खाजगी आयटीआय मधील 124 विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी निवड झाली आहे.
त्याबद्दल निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष
डॉक्टर सुरेशराव बेल्हेकर संचालिका व उपाध्यक्षा डॉक्टर सौ. रंजनाताई बेल्हेकर, प्राचार्य हेमंत अहिरे,
रंजनाताई बेल्हेकर,कार्याध्यक्ष अभिषेक बेल्हेकर प्राचार्य रोहन कांडेकर, प्राध्यापक बाविस्कर, श्री तुकाराम खाटीक सर श्री गुलाब जावेद पठाण यांनी विशेष अभिनंदन केले आहे..
Discussion about this post