

सप्तशृंगगड ।
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगीगडावर सुरु असलेल्या विविध विकासकामाबाबत सप्तशृंगगड येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अकुनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी ग्रामपंचायत, देवी संस्थान, रोपवे प्रकल्प, तालुका वैद्यकीय अधिकारी कळवण, कार्यकारी अभियंता, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभाग कळवण, जलसंपदा विभाग कळवण, व्यापारी प्रतिनिधी, महावितरण कंपनी कळवण, अधीक्षक, वनपरिक्षेत्र कळवण, पोलीस निरीक्षक कळवण, राज्य परीवहन महा. मंडळ कळवण विविध अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळाबाबत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी सर्वांनी संगमतीने काम करावे असे आदेश बैठकीत देण्यात आले.
यात्रोत्सवापूर्वीच सर्व सोयी-सुविधांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी आनकुरी नरेश,व तहसीलदार
रोहिदास वारूळे यांनी दिल्या आहेत.
श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर ६ एप्रिलपासून चैत्रोत्सवाला प्रारंभ प्रारंभ होत होत असून, त्यादृष्टीने देवस्थान ट्रस्ट तसेच जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. या यात्रोत्सवासाठी राज्यभरासह इतरही राज्यांतून भाविक येतात. तसेच वर्षभरात गडावर भाविकांची ये-जा सुरूच असते. त्यातच २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने त्यादृष्टीने उपयोजना असणे, समन्वय सभा व विविध कामकाजांचा
आढावा यावेळी घेण्यात आला. विशेष करून घाटरस्त्याची सुरक्षा, गावातील अंतर्गत रस्ते, गटार, डोम रस्ते, भूमिगत विद्युत पुरवठा आदी कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी अधिकाऱ्यांसह देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सरपंच रमेश पवार, उपसरपंच संदीप बेनके, माजी सरपंच दत्तू बर्डे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय दुबे ,ग्रा पं, सदस्य राजेश गवळी, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व संस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते.
गडावरील विकासकामे चैत्रोत्सवाआधी होतील
तसेच कुंभमेळा दृष्टीने उपयोजनाची कामे सुरू आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी ट्रस्टतर्फे उपाययोजना केल्या आहेत. सर्व कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण केले जात आहेत.
- सुदर्शन दहातोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी चैत्रोत्सवाच्या दृष्टीने कामे जलद व्हावीत यादृष्टीने ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. भाविकांची कुठेही गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.
- संदीप बेनके, उपसरपंच, सप्तशृंगगड..
Discussion about this post