
संतोष देशमुख यांच्या श्रद्धांजलीसाठी सिद्धटेक गाव बंद; तीव्र निषेधाची लाट बीड – मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून संपूर्ण सिद्धटेक गाव बंद ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठा, दुकाने आणि सर्व व्यवहार बंद ठेवले.

आज सकाळपासूनच गावात शांतता असून, नागरिकांनी श्रद्धांजली म्हणून निषेध सर्व सिद्धटेक गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. संतोष देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते, त्यामुळे संताप वाढला. या घटनेच्या निषेधार्थ आणि सरकारकडे ठोस कारवाईची मागणी

करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत बंद पाळला.या घटनेनंतर गावातील विविध संघटना आणि राजकीय नेत्यांनी संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी मागणी केली. या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून, हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
Discussion about this post