पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आले तर लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिले होते.
राज्यातील कोट्यावधी लाडक्या बहिणी या २१०० रुपयांची वाट पाहत होत्या, मात्र बुधवारी विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या वक्तव्याने लाडक्या बहिणीच्या पदरी निराशा पडली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अदिती तटकरे?
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून देणार; या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या की, अधिवेशनाच्या काळात किंवा येत्या अर्थसंकल्पात २१०० रुपये देऊ असे आम्ही किंवा आमचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी कधीही म्हटलेले नाही.
जेव्हा एखादी योजना आपण जाहीर करतो तेव्हा तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी असतो. पण याच अर्थसंकल्पात २१०० रुपये करणार असं वक्तव्य मी कुठेही केलेलं नाही. त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट दिसून येत आहे की लाडक्या बहिणींना येत्या एप्रिल पासून २१०० रुपये मिळण्याची शक्यता मावळली आहे.
Discussion about this post