पांडुरंग जगताप (धारूर प्रतिनिधी)
वीज कंपनीतर्फे संपूर्ण राज्यात टप्प्याटप्प्याने प्री-पेड वीज मीटर बसविले जाणार होते. मोबाइल, डिश टीव्हीप्रमाणे रिचार्ज करा आणि वीज वापरा या संकल्पनेवर हे मीटर काम करते. पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर शासकीय वसाहती कार्यालयांमध्ये ते बसवले जाणार होते, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने मागणीनुसार घरगुती, व्यावसायिक ग्राहकांवर हे मीटर लादण्यात येणार होते.
परंतु, राज्यातील वीज ग्राहकांसाठी च्या प्री-पेड वीज मीटर वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या ऐवजी आता इलेक्ट्रॉनिक मीटर प्रणाली बसवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्री-पेड वीज मीटरबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
इलेक्ट्रॉनिक मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना दिवसा वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच सहा महिन्यांच्या कालावधीत हा बदल अंमलात आणण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवला जाणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Discussion about this post