धर्माबाद: प्र/ती माहिती अधिकार कायदा 2005 साली लागू करण्यात आला त्यामुळे सामान्य जनतेला शासकीय कामात झालेला भ्रष्टाचार ,काळाबाजार त्याचबरोबर एखाद्या कामात होणारा विलंब याबाबत माहिती मिळू लागली.
अण्णा हजारे यांनी सरकारला धारेवर धरून उपोषण करून माहिती अधिकार कायदा अमलात आणला यानंतर प्रत्येक कार्यालयात जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली त्यासंदर्भात प्रत्येक कार्यालयात दर्शनी भागात जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांची बोर्ड लावण्याचा शासनने आदेशही काढला या आदेशानुसार प्रत्येक कार्यालयात दर्शनी भागात बोर्ड लावण्याची सक्ती करण्यात आली होती परंतु सब पोस्ट मास्तर पोस्ट ऑफिस धर्माबाद४३१८०९ येथील कार्यालयात जन माहिती अधिकारी तथा प्रथम अपील अधिकारी यांचा बोर्ड कुठेही लावण्यात आलेला नाही शासकीय अधिकारीच शासकीय नियमांची पायमल्ली करत असतील आणि त्यावर वरिष्ठांकडून काहीही कार्यवाही होत नसेल हा कुतूहलाचा विषय आहे.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे धर्माबाद येथील कार्याध्यक्ष नितीन मदनबेरे यांनी सब पोस्ट मास्तर धर्माबाद ४३१८०९कार्यालयात जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांचा बोर्ड नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी दर्शनी भागात लावण्याची लेखी मागणीचे निवेदन दिनांक ५/०३/२०२५ मार्च रोजी दिले आहे.
हा बोर्ड लावल्यानंतर सामान्य जनतेची होणारी गैरसोय टळेल त्याचबरोबर जनतेला माहिती कुणाकडे मागायची, आपल्या अर्जावर कोणाकडे कारवाई होईल याबाबत माहिती मिळेल अशी आशा नितीन मदनबेरे यांनी व्यक्त केली.
Discussion about this post