छावा चित्रपट शासनाच्या दुरदर्शन सह्याद्री वाहीनीवर मोफत दाखविण्यात यावा.डोणगाव.
सध्या छत्रपती संभाजी राजे यांच्या जिवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट छावा हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट ऐतिहासिक असल्याने हा चित्रपट कुटुंबासोबत महाराष्ट्रातील सर्वोना मोफत पाहता यावा यासाठी शासनाच्या दुरदर्शन सह्याद्री वाहीनीवर १३ मार्चला होळीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा
अशी मागणी मेहकर क्रृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी संचालक अँड रामेश्वर पळसकर यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या कडे ६मार्च ला केली आहे.

Discussion about this post