
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
चाऊस घेणार मुख्यमंत्री साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट..
माजलगाव प्रतिनिधी, लोकनेते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांचा मागील 35 वर्षापासून वसा आणि वारसा चालवणारे माजलगाव मतदार संघाचे पाच वेळेस प्रतिनिधित्व करणारे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब हे एक अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. या मतदारसंघाचे नेतृत्व करत असताना त्यांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन मतदार संघाचा विकास केला आहे. माजलगाव मतदार संघात आजही सर्व जाती-धर्माचे लोक सुखाने आणि सौख्याने नांदत आहेत यामागे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब यांचे सुसंस्कृत राजकारण आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्रीपद सक्षमपणे सांभाळलेले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि अभ्यास दांडगा आहे त्यामुळे मंत्रिमंडळात रिक्त झालेल्या जागेवर त्यांचा समावेश करावा अशी मागणी मौलाना आझाद युवा मंचचे बीड जिल्हा अध्यक्ष नुमान अली चाऊस व संपूर्ण जिल्हाभरातून होत आहे तसेच बीड जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आमदार सोळंके सारखा संस्कृत पालकमंत्री असावा अशी ही मागणी होत आहे तरी या जनभावनेचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमदार सोळंके यांना संधी द्यावी..
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी..
Discussion about this post