विलास लव्हाळे जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून वैजापूर :दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्या प्रकरणी एका जणांविरुद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणपत म्हसू पिंगळे (५१) रा मनेगाव असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पिंगळे हे त्यांच्या दुचाकीवर (एम एच २० सी ए २६९०) २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७वाजता घराकडे येत होते. त्यावेळी देवगाव रंगारी ते शिवूर रस्त्यावर झोलेगावपाटीजवळ समोरून येणाऱ्या दुचाकी (एम एच २० एफ ए १४५२) स्वाराने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या आपघातात पिंगळे यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकी स्वार पळून गेला. या प्रकरणी कचरु म्हसू पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालका विरूद्ध शिवूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार सविता वरपे या करत आहेत.
Discussion about this post